लोकशाही पत्रकार संघ व वंचित बहुजन आघाडी उत्सव समितीतर्फे संविधान दिन उत्साहात साजरा*. दिनांक: २६ नोव्हेंबर २०२५वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, झेंडा चौक येथे लोकशाही पत्रकार संघ आणि वंचित बहुजन आघाडी उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्षा सौ. योगिताताई सचिन तुळणकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मेणबत्ती प्रज्वलन व पुष्पमाला अर्पण करून झाली. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमात डॉ. रामकृष्ण खुजे, प्रा. अरुणजी भगत, प्रल्हादजी मेश्राम, राजकुमार वाघमारे यांनी संविधानाचे महत्त्व, त्यातील मूलभूत अधिकार व कर्तव्ये तसेच भारतीय लोकशाहीची वैशिष्ट्ये याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.नगर पंचायत कर्मचारी—करनिरीक्षक लोणारे मॅडम, आरोग्य निरीक्षक तामगाडगे सर, ईजी. वृषभ राजुरकर, सैय्यद बाबू, गुरुप्रसाद तिवारी, धाबर्डे मॅडम, पेंदाम मॅडम, अनुप्रिया डुंमार, सौ. पुष्पा पांडे, अमोल बेले, विजय घुगसे, प्रफुल्ल रामटेके, राजू धाबर्डे, राहुल लोहकरे, कांतीलाल देवळे, म्हैस्के, कपिल लोहकरे, प्रीतम मोरे, अजय पानेकर, पंकज भगत, राजू रामटेके, शंभकर नगराळे, प्रकाश चौधरी, हरिचंद्र कांबळे, रवी कुंभारे, संजय चाटे आदी मान्यवर उपस्थित होते.पत्रकार बांधवांत सुरेशजी भगत, मनवर शेख, प्रमोद झिबड, गौतम शेळके, अब्दुलकदीर शेख मामू यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवला. तसेच मुक्ताबाई विद्यालय, समुद्रपूर येथील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.संविधान दिनानिमित्त लोकशाही मूल्यांचे जतन, संविधानाबद्दलची जागरूकता आणि समानतेचा विचार सर्वांनी आपल्या भाषणातून मांडला. कार्यक्रमाच्या शेवटी पत्रकार गौतम शेळके यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक मंडळाने परिश्रम घेतले.
byMEDIA POLICE TIME
-
0