*मानवत बसस्थान परिसर चिखलमय.*. (*मानवत / प्रतिनिधी.*)*मानवत मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रवेश द्बारावर सतत पडत असलेल्या पावसामुळे प्रवाशांना ये जा कुरतांना तारेवरची कसरत करण्याची पाळी आली असून या भागातील घाण पाणि मिश्रित गड्डे मूरूम टाकून बूजवावे अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.सविस्तर वृत्त असे की,मानवत शहर राष्ट्रिय महामार्गावर वसले असून बीड परभणी , परभणी पूणे, या मार्गावर मानवत हे तालूक्याचे शहर वसले असून शहरात रापमचे बसस्थानक आहे. पण गेल्या अनेक दिवसा पासून सतत पडत असलेल्या पावसामुळे प्रवेश द्वारावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने प्रवाशांना मात्र बसस्थानकात येण्यास व बाहेर जाण्यास मोठी तारेवरची कसरत करण्याची पाळी आली आहे. प्रवाशी संघटनानी या समस्येकडे लक्ष देऊन चिखलमय रस्त्याची डागडूजी मुरूम टाकूण करावी अशी मागणी मानवत शहरातील नागरिकासह प्रवाशांमधून होत आहे..
byमीडीया पोलीस टाईम
-
0