वर्धा सांस्कृतिक महोत्सव २०२५: स्टॉल धारकांची नाराजी, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे व्यवसायाला फटका .. (वर्धा ग्रामीण प्रतिनिधी विपुल पाटील वर्धा.) स्वावलंबी ग्राउंडवर नुकताच पार पडलेल्या वर्धा सांस्कृतिक महोत्सव २०२५मध्ये विविध राज्यांतील स्टॉल धारकांनी उत्साहाने भाग घेतला, मात्र अपुरी व्यवस्था आणि गैरसोयीमुळे त्यांची मोठी नाराजी व्यक्त होत आहे. नागपूर, राजस्थान, गुजरात, मुंबई, पुणे, नाशिक आणि वर्धा येथून आलेल्या व्यापाऱ्यांनी महोत्सव कमिटीवर जबाबदारी टाळण्याचा आरोप केला आहे.महोत्सवात खाद्यपदार्थ, कपडे, खेळणी, बांगड्या, बेंटेक्स, आयुर्वेदिक उत्पादने, कॉस्मेटिक्ससह विविध स्टॉल्स लावण्यात आल्या होत्या. फिंगर मंचुरियन, कोबी मंचुरियन, झुले, पाळणे यांसारख्या गोष्टींनी महोत्सव रंगवला, पण स्टॉल धारकांच्या मते, मूलभूत सुविधांचा पूर्ण अभाव होता. पाण्याची व्यवस्था नसल्याने, संडास आणि बाथरूमची सुविधा नसल्याने व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही त्रास सहन करावा लागला. काही ठिकाणी मॅरिनेट लावण्यामुळे व्यवसायाला अडथळा आला, आणि रोजच्या रोजच्या विविध कारणांमुळे स्टॉल्सचे नुकसान होत राहिले.एक स्टॉल धारक म्हणाले, "आजपर्यंत वर्धा शहरात रोटरी क्लब, लायन्स क्लबसारख्या इव्हेंट्समध्ये अशी वेळ आलेली नाही. हा पहिलाच महोत्सव असल्यामुळे कमिटीने व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केले. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून आलो, पण इथे बोलूनही कोणाचे मनोगत नीट पार पडले नाही. व्यवसायाला प्रचंड फटका बसला." दुसऱ्या व्यापाऱ्याने सांगितले की, "गैरसोयीमुळे ग्राहकही कमी झाले, आणि आमचा तोटा भरून काढणे कठीण आहे."महोत्सव कमिटीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. स्टॉल धारकांनी मागणी केली आहे की, भविष्यात अशा इव्हेंट्समध्ये सुधारणा व्हाव्यात, जेणेकरून स्थानिक आणि बाहेरील व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. हा महोत्सव शहराच्या सांस्कृतिक वैभवाला बळ देणारा असावा, पण व्यवस्थापनातील त्रुटींमुळे व्यापाऱ्यांमध्ये निराशा आहे.

वर्धा सांस्कृतिक महोत्सव २०२५: स्टॉल धारकांची नाराजी, मूलभूत सुविधांच्या अभावामुळे व्यवसायाला फटका ..                                                                           
Previous Post Next Post