उद्धव ठाकरे सेनेचे दिक्षा भास्कर भालेराव अटकळी प. स. गणातून इच्छुक.. (मारोती एडकेवार जिल्हा प्रतिनिधी नांदेड) नांदेड :बिलोली तालुक्यातील अटकळी पंचायत समिती गणातून येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. युवा सेना सर्कल प्रमुख भास्कर भालेराव यांच्या पत्नी दिक्षा भालेराव यांनी या गणातून उमेदवारी दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या इच्छुकतेमुळे युवासेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दिक्षा भालेराव या महिला बचत गट समाजकार्यात सक्रिय असून महिला वर्गात त्यांचा चांगला संपर्क असल्याचे बोलले जाते. स्थानिक प्रश्न, नागरिकांच्या समस्या आणि विकासाच्या मुद्द्यांवर त्या काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.आगामी काही दिवसांत त्यांच्या उमेदवारीवर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून अटकळी प. स. गणात राजकीय वातावरण तापू लागले आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0