*रापम* ची लालपरीत रत्नापूर येथे बिघाड ; प्रवाशी त्रस्त (मानवत विभागीय संपादक). —————————————जिल्हातील राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सामान्य प्रवाशांसाठी प्रवाशी बसेस चालविल्या जातात पण पाथरी व परभणी आगारातील अनेक ना दूरूस्त बसेल कसे बसे काम करून पाथरी परभणी या मार्गावर चालतात तर ना दूरूस्त बसेस मूळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करण्याची पाळी आगार प्रमूखांच्या मनमाणी कारभारामुळे त्रस्त झाले आहेत.सविस्तर वृत्त असे की, पाथरी ते परभणी या मार्गावर पाथरीची लाल परी निघाली व रत्नापूर येथे बिघाड झाली त्यामुळे परभणीला जाणार्‍या प्रवाशांना नाहक त्रास सहन करण्याची पाळी प्रवाशांवर आली.परभणी जिल्हातील परिवहन महामंडळातील बसेस अखेरची घटका मोजत आहेत.ना दूरूस्त बसेस रोड वर पाठवून आगार प्रमूख आपल्या अकलेचे धिंडवडे काढीत आहे.तर आगार प्रमूखाचे आपल्या दिव्य पसार्‍यावर लक्ष राहिले नाही. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करण्याची पाळी आली आहे.प्रवाशीं सघटना मात्र प्रवाशांचे हित बघण्या ऐवजी आगार प्रमूखांच्या हूजरे गीरी करण्यात जादा वेळ देत असल्यामुळे प्रवाशांच्या समस्याकडे दूर्लक्ष होत असल्याने आगार प्रमूखांच्या कारभारा विषयी संताप व्यक्त केला जात आहे..

रापम* ची लालपरीत रत्नापूर येथे बिघाड ; प्रवाशी त्रस्त    
Previous Post Next Post