*मंगरूळ येथे यासीन पाटील यांचे निधन*. (मानवत* {प्रतिनिधी. }——————————मानवत तालूक्यातील मंगरूळ बु, येथील सामाजीक कार्यात सदा अग्रेसर असलेले यासीन पाटील यांचे आज निधन झाले. निधनाची वार्ता कळताच आप्तगणासह, चाहत्यांनी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आप्तगणासह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.मानवत तालूक्यातील पंचकोशित सामाजीक बांधिलकी असलेले व दिलदार मनाचा राजा माणूस आज हरवला असल्याची खंत यावेळी अनेकांनी व्यक्त केली. जिल्हात मोठ्या प्रमाणात आपल्या सहकारी भावना व मनमिळावू पणामूळे मोठा मित्र परिवार त्यांना मिळाला होता. तर मित्र परिवारातील अनेक जन त्यांना डॅडी म्हणायचे तर अनेकांच्या व त्यांच्या वयात खूप अंतर होते, परंतु मैत्रीत समवयस्क असल्यासारखे ते नेहमी राहायचे साधी राहणी व उच्च विचार सरणी यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यासीन पाटील (डॅडी ) त्यांच्या अकस्मित जाण्याने सर्वसामान्य माणसाचा आधार हरवला असल्याची भावना व्यक्त केला गेली. यावेळी त्यांच्या अत्यंविधीसाठी परभणी जिल्हातून मोठा जनसागर लोटला होता.यावेळी आप्तगणासह चाहत्यामधून भावपूर्ण श्रद्धांजली ( डॅडी ) यांना अर्पण करण्यात आली. ***

*मंगरूळ येथे यासीन पाटील यांचे निधन*.                               
Previous Post Next Post