पोलीस ठाणे वर्धा शहर गुन्हे प्रगटीकरण पथकाची कामगीरी अवैध्य विदेशी दारूविक्रेता जेरबंद.. दिनांक 05.12.2025 रोजी पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस अधिकारी / अंमलदारांनी केलेल्या कार्यवाहीत अवैध्य दारूविक्रेता प्रसाद भगवानजी साह ु रा. मालगुजारीपुरा, वर्धा याचेवर दारूबंदी कायदयाअन्वये कार्यवाही करून आरोपीस अटक करण्यात आली. दि. 05.12.2025 रोजी मुखबीरकडुन मिळालेल्या खात्रीशीर खबरेची तात्काळ दखल घेत अवैध्य दारूविकता प्रसाद भगवानजी साह ु रा. मालगुजारीपुरा, वर्धा याच े राहते घराची पंचासमक्ष कायदेशीर घरझडती घेतली असता आरोपीच े घरझडतीत अवैध्यरित्या बिनापासपरवाना वेगवेगळया कम्पणीच्या 180 एम.एल. विदेशी दारून े भरलेल्या एकुण 186 बॉटल तसेच वेगवेगळ्या कम्पणीच्या 500 एम.एल.च्या 30 बिअर बॉटल असा एकुण जु. कि. 66500 रु चा माल मिळून आल्यान े जप्त केला. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अनुराग जैन, मा. अपर पोलीस अधिक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर, यांच े मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष ताले यांच े प्रत्यक्ष उपस्थितीत गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस अंमलदार गजेंद्र धर्मे, अभिजीत वाघमारे, चालक अजीम शेख, आकाश व इतर यांनी केली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0