सरस्वती विद्यालय पाईकमारी येथे "हिंद की चादर", श्री गुरु तेज बहादूर साहिब यांच्या 350 जयंती बाबत जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला. 'आनंददायी शनिवार' अंतर्गत ज्येष्ठ शिक्षक मा टी एस पंढरे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सामूहिक गीत गायन, प्रभात फेरी, इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज दिनांक ६ डिसेंबर २०२५, शनिवार रोजी सकाळी ९:०० वाजता भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.सर्वप्रथम शाळेचे ज्येष्ठ शिक्षक मा टी एस पंढरे यांच्या शुभहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिक श्री संजय दोंदल ,श्री नागरे श्री. साळवे हे प्रमुख अतिथी होते. यावेळी आदरणीय पंढरे सर यांनी श्री.तेग़ बहादूर साहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. तसेच श्री दोंदल यांनी देखील विद्यार्थ्यांना श्री तेग बहादुर साहेब यांच्या बलिदानाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील संपूर्ण शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. उपक्रमाच्या यशस्वीते करिता श्री तुकाराम पंढरे ,श्री संजय दोंदल , श्री गजानन साळवे ,श्री नागरे, जवादे निमजे व बुटले या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.मनवर शेख समुद्रपूर

Previous Post Next Post