*{नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालयामध्ये महापरिनिर्वाण दिन साजरा. }. **मानवत* {प्रतिनिधी. } —————————————येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष प्राथमिक विद्यालया मध्ये आज ६ डिसेंबर भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.यावेळी विद्यालयाचे शिक्षक मा. बालाजी गोंन्टे , एकनाथ मुळे , एकनाथ मुळे, संगीता थोरे , सुरेखा चंदाले यांच्या हस्ते भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी करणी सेनेचे युवा अध्यक्ष राम दहे पाटील, मा. मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.सविस्तर वृत्त असे की,येथील नेताजी सुभाष विद्यालया मध्ये आज महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या, मानवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, क्रांतीसूर्य, महामानव प.पूं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे बालाजी गोंन्टे सर, एस.एन.कच्छवे सर, एकनाथ मुळे सर, वैभव होगे सर, श्रीमती मिनाक्षीताई कहात , श्रीमती सोनालीताई माने, श्रीमती सुरेखाताई चंदाले , श्रीमती संगीताताई थोरे, आदीं सह शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या वेळी विद्यालयातील शालेय विद्यार्थ्यांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्र्यावर आप आपले विचार व्यक्त केले.🙏🌹🙏
byमीडीया पोलीस टाईम
-
0