*वर्धा नदीपत्रातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून त्याची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव यांचे पथकातर्फे धडक कारवाई* वर्धा नदीपत्रातून होत असलेल्या रेतीचे अवैधरित्या उपसा करून त्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमांवर उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव यांनी वारंवार धडक मोहीम राबवून कारवाई केलेली आहे. बोपापूर (वाणी) लगतचे वर्धा नदीचे पात्रातून रेतीचा अवैधरित्या उपसा करून त्याची चोरटी वाहतूक करीत असल्याचे विश्वसनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव डॉ. वंदना कारखेले मॅडम यांना मिळाली. उपविभागीय पोलिस अधिकारी पुलगाव डॉ. वंदना कारखेले मॅडम यांनी त्यांचे अधिनिस्त पोलिस अंमलदार यांचे सह तात्काळ बोपापूर (वाणी) लगतचे वर्धा नदी पात्रात छापा टाकून धडक कारवाई केली असता आरोपी नामे ट्रॅक्टर मालक व चालक 1) पारस ज्ञानेश्वर भोयर, वय 25 वर्षे, रा. रत्नापूर, ट्रॅक्टर चालक 2) अर्जुन मानकर रा. भिडी, ट्रॅक्टर चालक 3) अनिल गाडगे रा.अंदोरी हे वर्धा नदी पात्रातून शासनाचा महसूल बुडवून रेती चोरी करून त्याची अवैधारित्या वाहतूक करताना मिळून आल्याने आरोपी 1, 2, व 3 यांना ताब्यात घेतले. आरोपी क्र. 3 हा आरोपी क्र. 4) श्रीमती दुर्गा रवींद्र पारिसे रा. अंदोरी हिचे सांगण्यावरून रेती चोरी करिता वर्धा नदी पात्रात ट्रॅक्टरसह आल्याचे सांगितले. नमूद आरोपी क्र 1) याचे मालकीचा व ताब्यातील एक महिंद्रा 585 DI कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर क्र MH 32 TC 285 ट्रॉलीसह ज्यात ओली काळी रेती असलेला एकूण 9,09,000/– रु. आरोपी क्र 2) याच्या ताब्यातील आरोपी क्र 1 याच्या मालकीचा असलेला रेती उपसाकरिता मदतीला आणलेला एक महिंद्रा 575 कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर विना क्रमांकाचा अंदाजे किंमत 7,00,000/– रु, आरोपी 3) यांच्या ताब्यातील सोनालिका DI 745 कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर ट्रॉलिसह अंदाजे किंमत 9,00,000 रुपये असा *एकूण 25,09,000 रुपयेचा* मुद्देमाल जप्त केला. सदर चारही आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन देवळी येथे भारतीय न्याय संहिता, जमीन महसूल अधिनियम, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध कायदा, खाणी आणि खनिज कायदा तसेच महाराष्ट्र खनिज अधिनियम चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पुढील तपास पो उप नि कल्पेश मगरे करीत आहे. *सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे साहेब यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ वंदना कारखेले मॅडम, पोलिस अंमलदार दिपक जाधव, राजेश तिवस्कर यांनी केली आहे.*
byमीडीया पोलीस टाईम
-
0