जिल्हा अधिकारी यांच्या कडुन संतोष ताल्डे विशेष कौतुक. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.सेलू ): सेलू नगर परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. २ डिसेंबर २०२५) मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मतदारांना निर्भीडपणे आणि मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने, प्रभाग क्र. ०८/०३ यशवंत विद्यालय सेलू, येथील मतदान केंद्रावर मतदान ड्युटीवर असलेले मतदान अधिकारी संतोष ताल्डे यांनी बुथच्या प्रवेशद्वाराजवळ 8×10 ची एक सुंदर रांगोळी साकारली. या रांगोळीतून मतदार जन जागृती या विषयावर 'माझे मत माझा अधिकार, अशा प्रकारचे प्रभावी संदेश देण्यात आले होते. या कामी बुथवर असलेले पी.आर.ओ जाधव एन. पी.,मतदान अधिकारी नखाते आर.एन., लतीफ शेख यांनी सहकार्य केले.मा.​जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी या बुथला भेट दिली. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह भोसले, निवडणूक सूक्ष्म निरीक्षक अनुप देसाई, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शिवाजी मगर व तुकाराम कदम, गटविकास अधिकारी उदय जाधव तसेच गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, क्रीडा शिक्षक मास्टर ट्रेनर गणेश माळवे, मुकुंद आष्टीकर, बाळू बुधवंत ,मंडळ अधिकारी विजयकुमार बोधले, सुजित इंगोले,ओम कानडे,. यांनी मतदानाच्या दिवशी विविध मतदान केंद्रांची पाहणी केली. प्रभाग क्र. ०८/०३ येथील मतदान केंद्रावर पोहोचताच त्यांचे लक्ष या अनोख्या सजावटी कडे वेधले गेले.जिल्हा धिकाऱ्यांकडून विशेष कौतुक करुन ​या रांगोळीची संकल्पना आणि ती साकारण्याची पद्धत पाहून जिल्हाधिकारी महोदयांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी बुथवर उपस्थित कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यांनी घेतलेल्या या विशेष परिश्रमाबद्दल जिल्हा धिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी नमूद केले की, "केवळ ड्युटी करणे इतकेच नाही, तर अशा सर्जनशील पद्धतीने नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे आणि ते स्तुत्य आहे."​या कौतुका मुळे बुथ कर्मचारी यांना आपल्या कामाची पोचपावती मिळाली, तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळाली. मतदान प्रक्रिया शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी अशा प्रकारच्या अभिनव कल्पना निश्चितच उपयोगी ठरतात, असे मत या घटनेनंतर नागरिकांनी व्यक्त केले.

जिल्हा अधिकारी यांच्या कडुन संतोष ताल्डे विशेष कौतुक.                                                                                             
Previous Post Next Post