*मुख्यमंत्री साहेब आता खरचं गुटखा बंदी होइल का? जनतेचा सवाल*. नागपूर: राज्यभर वाढत चाललेल्या गुटखा रॅकेटच्या पार्श्वभूमीवर आज विधानसभेत आज प्रश्न मांडला गेला. शाळा व महाविद्यालयांच्या 100 मीटर परिसरात गुटखा विक्री रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले.विरोधकांनी गुटखा व्यवहारावर राजकीय व पोलिस संरक्षण असल्याचा मुद्दा ठाण मांडून मांडला. राज्यभर गुटख्याचा वाढता व्यापार, पत्रकारांवर होणारा दबाव, भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांचा हस्तक्षेप आणि नावापुरत्या कारवाया हि खरी परिस्थिती आहे. "मुख्यमंत्री आदेश देतात पण प्रशासन ऐकत नाही... राज्यात गुटखा माफिया हुकूमशहा बनले आहेत.अकोला अमरावती जिल्ह्यातील परिस्थिती तर अत्यंत गंभीर असून काही राजकारणी व पोलीस अधिकारी यांच्या आशीर्वादाने हा धंधा निर्भयपणे सुरू आहे. मध्यप्रदेश सीमेला लगत परतवाडा येथून दररोज शेकडो गुटख्याचे ट्रक अकोला अमरावती जिल्ह्यात दाखल होतात. पत्रकारांनी गुटखा माफियांचे गैरकारभार उघड करताच स्थानिक पोलीस मध्यस्थी करून प्रकरण दाबतात.मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी राज्यभर संयुक्त मोहिमेचे आदेश दिले असतानाही प्रत्यक्षात कारवाई होत नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. अशी जनते मध्ये चर्चा आहे. "राज्यभर गुटखा व्यापार मोकाट फिरतोय... मग गृहखातं नेमकं कुठे आहे?” असा सवाल आज हि जनता करीत आहे.वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर दर्जेदार पुनर्वसन केंद्रांची संख्या वाढवण्याचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात कोणतीही गती नाही.येणाऱ्या काळात राज्यभर बेधडक सुरू असलेल्या गुटखा रॅकेटवर मुख्यमंत्री कोणती ठोस पावले उचलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0