वर्धा शाळेतील शिक्षण आणि शाळेबाहेरचे शिक्षण हे भिन्न प्रकार असते तरी पूरक आहे. ज्ञानाला शिक्षणाची जोड दिली तर व्यक्तीला अपेक्षित उंची गाठण्यास अधिक वाव मिळतो. भाषण ही एक कला आहे. यासाठी अवांतर ज्ञानाचा उपयोग शिक्षणाच्या तुलनेत अधिक असतो, यासाठी वक्ता संवेदनशील बहुश्रुत, आणि भाषेवर प्रभुत्व असणारा असावा लागतो, भाषण कलेचा सराव आणि ध्यास असली की मिळणाऱ्या संधीचे सोने करणे वक्त्याला जड जात नाही. अशीच एक गुणी वक्ता कु. फौजिया खान हिचा उल्लेख एक बहुआयामी वक्ता म्हणून होणे ही अतिशय गौरवास्पद बाब आहे. अनेक कार्यक्रमातून तिने तिच्या प्रतिभेचे केलेले लक्षणीय सादरीकरण आणि तिने प्राप्त केलेले सन्मान आणि अनेक पुरस्कार अभिनंदनीय आणि आपणा सर्वासाठी गौरवाची बाब आहे, असे प्रतिपादन ऑल इंडिया शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही यांनी व्यक्त केले.ते सत्येश्वर सभागृहात वर्धेतील जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्सची द्वितीय वर्षांची विद्यार्थीनी कु. फौजिया हिचा सन्मान करतांना बोलत होते. फौजिया खान हिने लघुपाट कविता स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पोष्टर स्पर्धा, वक्तृत्वकला स्पर्धा, एन.सी.सी प्रशिक्षण शिबीरात सहभाग आदी अनेक क्षेत्रात पुरस्कार प्राप्त केले असूनफोरम तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी फोरमचे प्रदेश कार्यकारीणी सदस्य राजु लभाणे, सेंन्ट थॉमस इंग्लीश शाळेच्या प्राचार्य प्रिती सत्यम, लॉसन्स क्लॅबचे माजी अध्यक्ष विजय सत्यम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी कला, क्रिडा, साहित्य यात पारंगत व्हावे यासाठी शालेय जीवनापासूनच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देवून योग्य दिशा देण्याचे कार्य शालेय शिक्षणाचा एक महत्वाचा भाग असला पाहिजे, अशी भावना राजु लभाणे यांनी व्यक्त केली. कु. फोज़िया वहिद खान यांनी आपल्या यशाचे श्रेय आई वडिल व बहीन कु. फिज़ा खान यांना दिले आहे.कु. फौजिया खान यांना सन्मानित केल्याबद्दल त्यांचे फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेन्द्र सिंग, कार्याध्यक्ष डॉ. अनिल दक्ष, राष्ट्रीय महासचिव अबुबकर खाँन, लक्ष्मीनारायण चड्डा, किरण फुलझेले, इंद्रजीत लोणारे, अॅड, इब्राहीम बक्श आजाद, प्रिती भाल, प्रदेश महिला अध्यक्ष स्नेहलता सिंग, दिलीप शिरभाते, डॉ. विनोद अदलखीया, डॉ. प्रदिप कश्यप, अॅड. असद खान पटेल, अॅड. सुनील चौधरी, कोशी उल्हास वाघ, नरेश कुमरे, कु. आफरिन शेख आदी अनेक मान्यवरांनी तिचे कौतूक केले आहे..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0