दिनांक 11/12/2025 ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष मा. अतुलभाऊ वांदिले यांच्या वाढदिवसा निमित्याने जाम येथील छावरा आश्रम येथे स्वेटरचे वाटपराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धा जिल्हाध्यक्ष मा. अतुलभाऊ वांदिले यांच्या वाढदिवसानिमित्त अबरार फारुकी मित्र परिवार यांच्या वतीने जाम येथील छावरा आश्रमातील मतिमंद व गरजू नागरिकांना कडाक्याच्या थंडी मुळे होणाऱ्या त्रासापासून बचावासाठी स्वेटरचे वाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शहर कार्याध्यक्ष अमोल बोरकर, अबरार फारुकी, मोहम्मद शाहीद, बाबू चौहान, अमोल मडावी, ऋषिकेश फुटाणे आदी उपस्थित होते..मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा

Previous Post Next Post