अकोला मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम; खिचडी वाटप व दर्ग्यात चादर अर्पण.. अकोला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे पद्मविभूषण शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अकोला शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.या उपक्रमांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महानगर अकोला यांच्या वतीने शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांना गरम खिचडीचे वाटप करण्यात आले. तसेच आगा शाह बावा दर्ग्यात चादर अर्पण करून शरद पवार यांच्या दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.यानंतर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष व वरिष्ठ नेते श्याम अवस्थी, महानगराध्यक्ष रफीक सिद्दीकी,प्रदेश सचिव जावेद जकारिया महानगर कार्याध्यक्ष सय्यद युसूफ अली, देवेंद्र ताले, अकोला पश्चिमचे अध्यक्ष महमूद खान पठाण, माजी नगरसेवक फरीद पहलवान, अल्पसंख्याक विभागाध्यक्ष वसीम खान, दिव्यांग सेल अध्यक्ष सालारभाई, तसेच मोहम्मद शफीक, अमन घरडे, इब्राहिमभाई, वसीम सिद्दीकी, शाहिद सिद्दीकी यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महानगर अकोला तर्फे घेण्यात आला असून महानगराध्यक्ष रफीक सिद्दीकी यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीपणे पार पडला. *अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान*
byमीडीया पोलीस टाईम
-
0