मालेगाव मध्ये वंचित बहुजन आघाडी व मालेगाव सेक्युलर फ्रंटची एकत्रित करण्याची घोषणा मालेगाव आतला वंचित बहुजन आघाडी निर्णयक... (नांदगाव नाशिक जिल्हा विभागीय प्रतिनिधी)आगामी मालेगाव महानगरपालिका निवडणूक 2020 च्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी व मालेगाव सेकंड यांची संयुक्त पत्रकार परिषद दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी शनिवारी आयोजित करण्यात आली. पत्रकार परिषदेत मालेगाव सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून लढवण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. मालेगाव सेकुलर फ्रंट मध्ये वंचित बहुजन आघाडी, इस्लाम पक्ष आणि समाजवादी पार्टी यांचा सहभाग असून आगामी महापालिका निवडणूक ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे लढवणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या आघाडीच्या माध्यमातून मालेगाव शहराच्या विकासासाठी सामाजिक, न्याय, धर्मनिरपेक्षता आणि सर्व समावेशक राजकारणाचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या संयुक्त पत्रकार परिषदेस मालेगाव सेक्युलर फ्रंट व सहभागी पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये माजी आमदार व इस्लाम पक्षाचे प्रमुख शेख रशीद, समाजवादी पार्टीचे प्रमुख व माजी नगरसेवक मुस्तकीम डिग्निटी डॉक्टर अखलाख, वंचित बहुजन आघाडीचे सोशल मीडिया प्रमुख जितरत्न पटाईत, नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष दीपक पवार, महासचिव संजय जगताप यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत युतीची भूमिका भाजप - आरएसएस च्या धार्मिक ध्रुगीकरणाला विरोध, रणनीती तसेच मालेगाव शहराच्या प्रश्नावर संयुक्त भूमिका मांडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या युतीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीला आगामी निवडणुकीत बारा ते पंधरा जागा जाहीर करण्यात आल्या असून काही जागांवर अजून चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात मालेगाव शहरांमध्ये या मालेगाव सेक्युलर फ्रंटची मोठी ताकद निर्माण झाली आहे. या युतीच्या घोषणेमुळे मालेगाव शहराच्या राजकारणात मोठी उलाढाल पाहायला मिळाली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल (नाशिक)
byमीडीया पोलीस टाईम
-
0