*नेताजी सुभाष विद्यालयात *N.M.M.S.* परिक्षा संपन्न. (मानवत / प्रतिनिधी.—————————मानवत येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यासाठीची आज दिनांक 28 डिसेंबर रोजी. *NMMS* ची परीक्षा शांततेत व सुरळीत पार पडली.सविस्तर वृत्त असू की, आज येथील नेताजी सुभाष शिक्षण संस्थेच्या , नेताजी सुभाष माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात इयत्ता आठवीतील शालेय विद्यार्थ्यासांठी शिष्यवृत्ती परिक्षा *एन. एम.एम. एस. परिक्षा* घेण्यात आली असून परीक्षेसाठी शहरी व ग्रामीण भागातून नेताजी सुभाष विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एकूण 397 विद्यार्थी नोंदणीकृत होते.पैकी 386 विद्यार्थी यांनी परीक्षा दिली. शहरातच परीक्षा केंद्र असल्या मुळे पालकांनी समाधान व्यक्त केले. परीक्षेचे काम केंद्रप्रमुख म्हणून श्री संजयजी लाड यांनी यावेळी काम पाहिले होते. तर उपकेंद्र संचालक म्हणून श्री. गणेशजी सिरसकर तसेच गटसाधन केंद्रातील मा. राजकूमारजी गाढे सर, लिपिक म्हणून विद्यालयातील श्री. दत्तरावजी आधाटे यांनी काम पाहिले. यावेळी परीक्षा सुरळीत पणे पार पाडण्यासाठी विद्यालयातील श्री सदाशिवराव होगे सर,कैलासचंद्र सारडा सर, माणिकराव सिसोदे सर, बाळासाहेब नाईक सर, धनंजय गरुड सर, राजन सूर्यवंशी सर यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच पर्यवेक्षण कामी परीक्षणाच्या कामी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी काम पाहिले. तर यावेळीशासकीय नियमाचे काटेकोर पणे पालन करून परीक्षा पार पडली.***

*नेताजी सुभाष विद्यालयात *N.M.M.S.* परिक्षा संपन्न.                                                                                              
Previous Post Next Post