टी एम अकॅडमी अँड ब्युटी पॅलेस प्रस्तुत**कराओके सिंगिंग प्रतियोगिता व कॅलेंडर लॉन्चिंग- 2026*. (प्रतिनिधी विपुल पाटील )नागपूर : टी एम एस अकॅडमी अँड ब्युटी पॅलेस च्यावतीने कराओके सिंगिंग प्रतियोगिता अँड कॅलेंडर लॉन्चिंग - 2026 च्या कार्यक्रमाचे आयोजन के पी हॉटेल अजनी येथे आयोजित करण्यात आले होते. कराओके सिंगिंग प्रतियोगितेत फर्स्ट विनर स्वरा माथुरकर तर सेंकड विनर हेमलता सलामे आणि थर्ड विनर सचिन शर्मा यांनी बाजी मारली.त्यावेळी या प्रतियोगितेत ज्यांनी भाग घेतला त्यांच्यासाठी बक्षीस वितरण ठेवण्यात आले होते. आणि सन्मानचिन्ह देऊन प्रमाणपत्राचे वाटपही केले. सर्वप्रथम पाहिले बक्षीस ५ हजार रुपये, दुसरे बक्षीस २ हजार, आणि तिसरे बक्षीस १ हजार रुपये रोख देण्यात आले. आंतरराष्ट्रीय कलाकार व पार्श्वगायिका सेलिब्रिटी पाहुणे म्हणून श्रुती जैन यांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी अनिल धकाते, शर्मिला कंळबे, अलिशा मोहम्मद, श्वेता वानखेडे, मोनिका नंदनवार, सुरेखा नवघरे, रश्मी तिरपुडे, नादियाँ हुसेन आणि शन्नो मस्करे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या दरम्यान जजेस म्हणून विशाखा पांडे आणि मीनल लाखे यांनी आपली कामगिरी बजावली. आयोजक तेजश्री उपाध्याय यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
byमीडीया पोलीस टाईम
-
0