**जि.प.प्रशाळेत कूष्ठरोग निर्मूलन कार्यशाळा संपन्न* (मानवत / प्रतिनिधी).कुष्ठरोग आणि क्षयरोग निर्मूलन करण्यासाठी मार्गदर्शन येथील पीएमश्री जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मानवत येथे आज दिनांक 26 डिसेंबर रोजी आरोग्य शिक्षण विषय अंतर्गत संसर्गजन्य आजार, लक्षणे आणि उपाययोजना उपचार यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मानवत येथील ग्रामीण रुग्णालय आरोग्य विभागाचे श्री नामदेव पठाडे आणि परमेश्वर सावंत यांना कुष्ठरोग आणि क्षयरोग या संसर्गजन्य रोगा विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. शालेय मंत्रिमंडळातील आरोग्य मंत्री आणि उप आरोग्य मंत्री विद्यार्थी ओवी दत्तोबा गाढवे व ज्ञानराज अशोक नायबळ यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माणिक घाटूळ यांनी उत्तम आरोग्यासाठी संसर्गजन्य आजारांवर मात करण्याची प्रतिकार क्षमता आवश्यक असल्याचे आणि आजाराची लक्षणे, आणि उपचार या विषयांवर माहिती असल्यास कुठल्याही आजारावर मात होऊ शकते हे प्रास्ताविकातून सांगितले यावेळी नामदेव पठाडे सर यांनी कुष्ठरोग व त्याची लक्षणे याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कुष्ठरोगाची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार आहेत आणि कुष्ठरोग संपूर्णत बरा होऊ शकतो याविषयी माहिती दिली.तसेच क्षयरोग हा देखील संसर्गजन्य आजार असून त्याची लक्षणे आढळून आल्यास जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये मोफत उपचार होतात याविषयी परमेश्वर सावंत यांनी माहिती दिली.या कार्यशाळेत विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली व त्यांना सकस आहार, फळे आणि पालेभाज्या जास्त प्रमाणात आहारात असणे आवश्यक आहे असे श्री राजकुमार लांडे सर यांनी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे आयोजन करण्यासाठी श्रीमती सुनिता जोशी मॅडम व सत्यभामा गिरी मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यशाळेत सकाळ सत्रातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला संदीप काळे सर, सुरेश सातपुते सर, ज्ञानेश्वर निपाणीकर, सुरेश पवार, वसंत वांगीकर,मनोज वांगीकर, सोनय्या कीर्तनकार सर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0