ग्राहक पंचायत महाराष्ट्र भद्रावतीची साप्ताहिक बैठक दर गुरुवारी. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.30 : ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण, जनजागृती आणि तक्रार निवारणाच्या उद्देशाने ग्राहक पंचायत महाराष्ट्र, शाखा भद्रावती यांच्या वतीने दर आठवड्याला साप्ताहिक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. ही बैठक प्रत्येक गुरुवारी सायंकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत भद्रावती शहरातील हुतात्मा स्मारक येथे नियमितपणे घेण्यात येणार असल्याची माहिती ग्राहक पंचायतने दिली आहे.आजच्या काळात ग्राहकांची फसवणूक, चुकीची सेवा, निकृष्ट दर्जाची उत्पादने, अवाजवी दर, ऑनलाइन व्यवहारातील अडचणी, विमा, बँकिंग, वीज, पाणी, मोबाईल सेवा यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा सर्व प्रकारच्या समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी आणि योग्य तो कायदेशीर सल्ला देण्यासाठी ही साप्ताहिक बैठक उपयुक्त ठरणार आहे.भद्रावती शहर व तालुक्यातील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या ग्राहकविषयक तक्रारी किंवा समस्या असल्यास, त्यांनी प्रत्येक गुरुवारी सायंकाळी ठीक ६.०० वाजता हुतात्मा स्मारक येथे सर्व संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. बैठकीदरम्यान तक्रारींची नोंद घेतली जाईल तसेच पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले जाईल.ग्राहक पंचायत महाराष्ट्र, भद्रावती शाखेचे अध्यक्ष प्रवीण चिमूरकर (मो. ९१५६३०४४३०) व सचिव वतन लोणे (मो. ८५५४८८९२६७) यांनी नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घ्यावा व आपल्या हक्कांसाठी जागरूक राहावे, असे आवाहन केले आहे
byमीडीया पोलीस टाईम
-
0