विवेकानंद विद्यालयात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने जनजागृती मोहीम*. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि 30 : स्थानिक विवेकानंद माध्यमिक विद्यालयात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चंद्रपूर यांचे वतीने जनजागृती मोहीम कार्यक्रम दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोज मंगळवारला आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना बांदूरकर मॅडम, प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती भस्मे मॅडम तसेच, प्रमुख अतिथी म्हणून प्रोबेशन अधिकारी श्री चव्हाण साहेब, विधी सल्लागार ऍड. प्रीती खातखेडे मॅडम, बाल संरक्षण कक्ष सामाजिक कार्यकर्ती श्रीमती प्रतिभा मडावी मॅडम आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.प्रतिमा पूजन व मान्यवरांच्या स्वागतानंतर श्रीमती भस्मे मॅडम, श्रीमती प्रीती खातखेडे मॅडम, श्रीमती मडावी मॅडम यांनी विद्यार्थ्यांनागुड टच - बॅड टच, आपले सुरक्षित स्थान, बाल शोषण, चांगल्या - वाईट सवयी, बाल विवाह, लैंगिक शिक्षण, आदी बाबींवर सखोल मार्गदर्शन केले.आपल्या मार्गदर्शना दरम्यान श्रीमती भस्मे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना विविध आनुषंगिक प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची समयसूचकता बाळगून अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस म्हणून नोटबुक्स वितरित करण्यात आले.सदर कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे संचालन श्री तुकाराम पोफळे सर आणि आभार प्रदर्शन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ कल्पना बांदूरकर मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक वृंद दयाकर मग्गीडवार, संजय आगलावे, मेघा ताजने आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विनोद गावंडे, बंडू कांबळे आदींनी सहकार्य केले.

विवेकानंद विद्यालयात जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने जनजागृती मोहीम*.                                                                                                
Previous Post Next Post