रायगड स्वाभिमान वृत्तपत्राचा तिसरा वर्धापन दिन सोहळा रोहा येथे यशस्वीपणे संपन्न. (वर्धा जिल्हा प्रतिनिधीअब्दुल कदीर).**रोहा:** रायगड स्वाभिमान वृत्तपत्राच्या तिसऱ्या वर्धापन दिन सोहळ्याने रोहा शहरात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले. १४ डिसेंबर २०२५ रोजी तांबडी रोड येथील श्रीकृष्ण हॉटेल अँड फॅमिली गार्डन येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मुख्य संपादक रघुनाथ कडू यांच्या हस्ते गणेश पूजन, दीप प्रज्वलन आणि श्रीफळ फोडून झाली. या सोहळ्यात पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन माणुसकी आणि अन्यायाविरुद्ध लढा ही रायगड स्वाभिमानाची ओळख असल्याचे मुख्य संपादक रघुनाथ कडू यांनी प्रास्ताविकेत ठणकावून सांगितले.कार्यक्रमात राज्य माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष सुभाषजी बसवेकर, नायब तहसीलदार राजेश थोरे, संविधान अभ्यासक नूरखा पठाण, वाईस ऑफ मीडियाचे कोकण विभाग अध्यक्ष अरुण ठोंबरे, आयुर्वेदिक सल्लागार प्रदीप, ची भेकरे माजी नगरसेवक दीपक शेठ तेंडुलकर, कृषी तज्ञ मांडवकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. नूरखा पठाण यांनी संविधानाची ताकद आणि नागरिकांचे हक्क यावर मार्गदर्शन केले, तर भारतीय संविधानाचे उद्योग विषयाचे सामूहिक वाचन करण्यात आले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून १५० ते २०० प्रतिनिधी-पत्रकार उपस्थित असून, राज्यभरात २५० हून अधिक प्रतिनिधी रायगड स्वाभिमानशी जोडले गेले आहेत.वर्धा जिल्ह्यातील पत्रकार अब्दुल कदीर मामु (जेष्ठ पत्रकार) आणि विपुल पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि सर्टिफिकेट देऊन सत्कार करण्यात आला.तसेच 40 ते 50 पत्रकारांना सन्मानित करून सन्मानचिन्ह देण्यात आले उपस्थित मान्यवरांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष टेंबे यांनी केले, तर पत्रकार कैलास राजे घरत यांनी आभार मानले; शेवट वंदे मातरम या सामूहिक राष्ट्रीय गीताने झाला. उपसंपादक रोहन रघुनाथ कडू, सहसंपादक अरविंद मगर, आवृत्ती संपादक किरण मोरे, सर्व प्रतिनिधी-पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी विकास प्रतिष्ठान रोहा आणि तालुका अध्यक्ष गणेश भगत यांचे मोलाचे योगदान लाभले
byमीडीया पोलीस टाईम
-
0