ध्वज हि हिंदू धर्माची , सनातन धर्माची पताका आहे.**@)> १००८ जगद् गूरू स्वामी रामदयालजी महाराज*. (मानवत / अनिल चव्हाण.)———————————श्रीराम मंदिरावर फडकविण्यात आलेले ध्वज हे. सनातन हिंदू धर्माची निशाणी आहे. हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे.. स्वामी रामदयालजी महाराज अयोध्या येथील श्रीराम मंदिरावर फडकविण्यात आलेले ध्वज हे सनातन हिंदू धर्माची निशाणी असून हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. जगातील सर्व धर्मापैकी आपला हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. असे विचार आंतरराष्ट्रीय रामस्नेही संप्रदाय शहापुरा धाम जिल्हा भीलवाडा राजस्थान येथील संप्रदायाचे 14 वे पीठाधीश्वर 1008 जगतगुरु स्वामी रामदयालजी महाराज यांनी. येथील रामस्नेही संप्रदायाचे रामबाडा मध्ये दि.29 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 यादरम्यान सप्तदिवशीय आध्यात्मिक सत्संग महोत्सव व वाणी प्रवचनाचे आयोजन प्रसंगी आपल्या विचार व्यक्त करताना म्हणाले. सप्तदिवशीय अध्यात्म सत्संग महोत्सवाचे प्रथम पुष्पगुंपतांना ते पुढे म्हणाले. मानवत नगरीमध्ये खरोखर मानवताचे दर्शन घडते. मानवत ही धरती ही अत्यंत पवित्र आहे. या भूमीमध्ये माझे जीवनाचे कल्याण करणारे आध्यात्मिक गुरु संत श्री भगतराम जी महाराज यांची तपोभूमी आहे. मानवतची भूमी ही राम नाम जपाने पवित्र झालेली आहे. या भूमीत एवढे आकर्षण आहे की मला येथे येण्यासाठी भाग पडले . मी स्वतःला खरोखर भाग्यवान समजतो. या पवित्र भूमीमध्ये रामस्नेही संप्रदायाच्या परंपरेनुसार चातुर्मासाचे आयोजन ही करण्यात आले होते. या पवित्र भूमीत आंतरराष्ट्रीय रामस्नेही संप्रदाय शहापुरा धामचे तेरावे पिठाधिश्वर ब्रह्मलीन श्री रामकिशोर जी महाराज यांचेही चातुर्मास संपन्न झाले. म्हणून मानवतची भूमी ही अत्यंत पवित्र आहे. आत्माचे संबंध थेट परमात्म्याशी जुळलेले आहे. आत्मा कधीही मरत नाही की सदैव अमर आहे .आपला शरीर मृत्यू पावतो. आत्मा ही आत्म्याची साक्षीदार आहे. मानवतचे स्नेह संबंध आंतरराष्ट्रीय रामस्नेही संप्रदायाशी अनेक वर्षापासून जुळलेले आहे. येथील रामस्नेही संप्रदायाच्या अनुयायांनी व राम प्रेमींनी माझ्या गुरुचे नाम जपाची साधना गंगा सतत प्रवाहित ठेवलेली आहे. खरोखर मानवत मध्ये मानवता आहे .या भूमीत आत्मा श्रद्धाचे जतन केले जात असल्याने मला येथे येण्यासाठी भाग पडले आहे.रामायण कसे जगावे तर श्रीमद् भागवत हे कसे मरावे याची शिकवण देतात. कौरव पांडवाच्या युद्धामध्ये युद्ध भूमीमध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितले महागाव विजय निश्चित आहे. कारण माझ्याजवळ माखनचोर आहे. मी माखन प्रेमी आहे. भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर केलेले हे ऐतिहासिक क्षण आहे. आपला हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. सनातन धर्म आहे. इतर धर्मापेक्षा हिंदू धर्म हा सर्वश्रेष्ठ आहे. आयोजित तील श्रीराम मंदिर आलेले *ध्वज हे हिंदू धर्माची सनातन धर्माची निशाणी आहे.* राम नाम हे निर्गुण रुपी आहे. राम नाम जपानी जीवनाचे कल्याण होऊन मुक्ती प्राप्त होते. आपल्या आयुष्याचे कल्याण होते संसारातील संस्काररूपी नौका पार करण्यासाठी राम नाम हे एक मूळ मंत्र आहे. राम नामात फार मोठी शक्ती आहे. आपला चेहरा जसा सुंदर आहे तसे आपले चारित्र्यही सुंदर असावे. सुरपंका नै आपला चेहरा बदलून लक्ष्मण पुढे आली असताना. तिने जरी चेहरा बदलला असला तरी तिचे चारित्र्य हे अपवित्र होते. लक्ष्मणाने तिचे हाव भाव पाहून तिचे नाक कापले. म्हणून आपला चेहरा जेवढा सुंदर आहे तेवढेच आपले चारित्र्य सुंदर व पवित्र असावे. तन मना बरोबर आपले चरित्र शुद्ध व पवित्र असावे. संसार हा स्वार्थाने भरलेला आहे. आपण नेहमी देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो. तुम्ही माता पिता तुम्हीही बंधू सखा....पण हे प्रत्यक्षात सत्य आहे का. आपल्या आईने आपल्याला जन्म दिला आपण तिच्या मध्ये परमात्मा पाहतो का. आपल्या जन्मदात्या वडीलामध्ये परमात्म्याचेस्वरूप पाहतो का. आज भाऊ भावामध्ये स्नेह नाही एकमेकाचे शत्रू आहेत. का हे बंधू प्रेम आहे का. वरील संबंधा मध्ये परमात्म्याचे स्वरूप का दिसत नाही. ज्यांच्यावर परमात्म्याची कृपा होते त्यांचे जीवन धन्य होते. आपले दैनंदिन जीवन जगत असताना चेहऱ्याबरोबर आपले चारित्र्य सुंदर व पवित्र असावे. राम नाम जपाने आपले जीवनाचे कल्याण करून घ्या. रामाशी संबंध ठेवणारा हा रामस्नेही होय. असे विचार आंतरराष्ट्रीय रामस्नेही संप्रदाय शहापुरा धाम जिल्हा भीलवाडा राजस्थानचे चौदावे पीठाधीश्वर स्वामी रामदयाल जी महाराज यांनी येथील रामबाडामध्ये सप्तदिवशीय आध्यात्मिक सत्संग प्रवचनाच्या आयोजन प्रसंगी प्रथम पुष्पगुतांना सांगितले.आचार्य जगद्गुरु स्वामी रामदयालजी महाराजांचे दिनांक 29 डिसेंबर रोजी मानवत नगरीमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. येथील कापड चौक पासून ते मंत्री गल्ली मार्गे रामबाडा पर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली.रामस्नेही संप्रदायाचे अनुयायी व रामप्रेमी यांच्याकडून आचार्य जगद्गुरु स्वामी रामदयाल जी महाराज यांचे भव्य स्वागत करण्यात आले.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0