शिवसेना (उबाठा ) पक्षाचे चोपडा शहराध्यक्ष महेंद्र भोई यांचा राजीनामाडिसेंबर २९, २०२५ शिवसेना (उबाठा ) पक्षाचे चोपडा शहराध्यक्ष महेंद्र भोई यांचा राजीनामा. (चोपडा दि.२९(प्रतिनिधी) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चोपडा शहर प्रमुख महेंद्र मोहन भोई यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुख उपनेते तथा नंदुरबार संपर्क प्रमुख श्री. गुलाबराव वाघ यांच्याकडे नुकताच दिला असून पक्षाशी मी प्रामाणिक असल्यावर देखील पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडे दूर्लक्ष करतात त्यामुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.राजीनाम्यात स्पष्ट केले आहे की,मी पक्षाचा मागील १५-२० वर्षापासुन सक्रीय कार्यकर्ता व सदस्य आहे. मी चोपडा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत नगरसेवक पदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेले होते त्यावेळी मला कोणत्याही प्रकारचे सहकार्य पक्षामार्फत अथवा पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून मिळाले नाही, त्यामुळे मी पराभूत झालो आहे असा घणाघात करून त्यामुळे मी माझ्या पदाचा व सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. तरी माझा राजीनामा वरिष्ठांनी स्विकारावा असे त्यांनी म्हटले आ
byमीडीया पोलीस टाईम
-
0