*मिरननाथ महाराज दिंडी सोहळ्यात सामाजिक सेवेला मोठा प्रतिसाद...** भाविकांसाठी चहा, सरबत आणि पाण्याचे वाटप... (देवळी तालुका प्रतिनिधी:-सम्यक ओंकार ) वर्धा जिल्हातील देवळी शहरातील ग्रामदैवत मिरननाथ महाराज यांच्या दिंडी सोहळ्याच्या पारंपरिक उत्साहात यंदा सामाजिक बांधिलकीचे दर्शन देखील घडले. दिंडी मार्गावर विविध समाजसेवी मंडळे व भक्तगणांच्या वतीने श्रद्धाळू भाविकांना चहा, सरबत व शुद्ध पाण्याचे विनामूल्य वाटप करण्यात आले. उष्ण वातावरणात दर्शनासाठी पायपीट करणाऱ्या भाविकांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळाला. दिंडी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परिसरासह जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने भक्त देवळीत दाखल झाले होते. गर्दीचा अंदाज लक्षात घेऊन चहा-सरबत वाटप स्टॉल्स दिंडी मार्गावरील विविध महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात आले. स्वयंसेवकांनी भक्तांना आदरपूर्वक पेय देत सेवा केली. भाविकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पाहायला मिळाले. या उपक्रमात युवक मंडळे, व्यावसायिक, धर्मशिक्षण केंद्रातील स्वयंसेवक, तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. “सेवा हीच खरी पूजा” या भावनेतून हा उपक्रम राबवण्यात आला असून संत परंपरेतील दिंडी सोहळ्याचे सामाजिक मूल्य अधिक दृढ झाले, अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली. सोहळ्यादरम्यान स्वच्छता, शिस्त व वाहतुकीची काळजी घेत पोलिस प्रशासनाने देखील योग्य नियोजन केले होते. दिंडी मार्गावर कुठल्याही प्रकारची गैरसोय भाविकांना होऊ नये यासाठी सर्व स्तरावरून उत्तम व्यवस्थापन करण्यात आले. या निमित्ताने मिरननाथ महाराज दिंडी सोहळ्यात श्रद्धा, भक्ती, सेवा आणि स्नेहाचे सुंदर दर्शन घडले. भाविकांनीही सर्व स्वयंसेवकांचे मनःपूर्वक आभार मानले व पुढील वर्षी अधिक चांगल्या व्यवस्थेसह हा उपक्रम सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

*मिरननाथ महाराज दिंडी सोहळ्यात सामाजिक सेवेला मोठा प्रतिसाद...** भाविकांसाठी चहा, सरबत आणि पाण्याचे वाटप...                                                                        
Previous Post Next Post