मनमाड आंबेडकर विद्यार्थी वस्तीगृह येथे पंचशील बॉईज व शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शहराध्यक्ष भारत बनकर यांच्या तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना अन्नदानाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहरप्रमुख मयूर बोरसे, माजी नगराध्यक्ष योगेश(बबलू) पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी महिंद्र गरुड, प्रमोद अहिरे, दिलीप सूर्यवंशी, निलेश सापकाळे, महेश कापडणे, विशाल लोंढे, अमोल काळे, विशाल लोंढे, सौरव लहिरे, आकाश जोगदंड, निशांत अहिरे, प्रथमेश खैरनार, सागर अहिरे, रोहित शिंदे, किरण भालेराव, सुशांत जाधव, प्रितेश जगताप, स्तवन अल्हाट, जयेश बनकर, यश जगताप, योगेश सूर्यवंशी, निलेश व्यवहारे उपस्थित होते.सूत्रसंचालन राहुल घोडेराव सर यांनी केले.

Previous Post Next Post