*हिंगणघाटच्या सांस्कृतिक गोंधळ कार्यक्रमात लोकनाट्य कलाकार अनिलजी कळमकर यांची प्रेरणादायी भेट* मनवर शेख दिनांक : ५ डिसेंबर २०२५हिंगणघाट — शहरात आयोजित सांस्कृतिक गोंधळ कार्यक्रमात काल एक अद्वितीय, उत्साहवर्धक आणि मनाला स्पर्शून जाणारा क्षण अनुभवायला मिळाला. नागपूरच्या हुलकेश्वर माळगी नगरातून आगमन केलेले प्रख्यात लोकनाट्य कलाकार, झाकीकार आणि वेशभूषाकार अनिलजी कळमकर यांची उपस्थिती हा कार्यक्रमाचा खास आकर्षणबिंदू ठरला.हा सांस्कृतिक सोहळा श्री. अतुल कातोरे यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी मा. भवानी गोंधळी संच, वायगाव (हळद्या), ता. समुद्रपुर, जि. वर्धा यांच्या पारंपरिक सादरीकरणाने वातावरण मंत्रमुग्ध झाले.संचातील कलाकारांमध्ये—संंबळ वादक प्रमोद झिबडतून-तूना वादक लक्ष्मणजी मुळेमंदिरा वादक गणेश श्रावनेकलाकार संजय वहाडेअनिलजी झाडे सरबॅन्जो वादक करण कळसकरया सर्व कलाकारांनी उत्कृष्ट, दमदार आणि तालबद्ध कलाविष्कार सादर करून उपस्थित रसिकांची भरभरून दाद मिळवली.कार्यक्रमादरम्यान घडलेला सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे अनिलजी कळमकर यांची अनपेक्षित पण मनस्पर्शी भेट. संत-महापुरुषांची वेशभूषा, पारंपरिक लोकनृत्य भूमिका आणि लोककलेची विशिष्ट शैली यांमध्ये त्यांनी घडवलेली विलक्षण ओळख विदर्भातील लोककला क्षेत्रातील एक तेजस्वी पैलू मानली जाते.अनिलजींचे साधेपण, कलाप्रेम आणि लोकपरंपरेप्रती असलेली त्यांची निष्ठा यामुळे ते नवोदित कलाकारांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा अधिक खुलली असून कलाकारांमध्ये सांस्कृतिक ऐक्याची भावना दृढ झाल्याचे उपस्थितांनी सांगितले.“हिंगणघाटच्या सांस्कृतिक वातावरणात कलरसांची नवी उधळण करणारा हा क्षण हृदयात कायम कोरला जाईल,” अशी भावना अनेक रसिकांनी व्यक्त केली.
byमीडीया पोलीस टाईम
-
0