**विद्यार्थी यांनी काळानुसार व कंपनीला लागेल ते कौशल्ये विकसीत करावे**@)> प्राचार्य डॉ.रामचंद्र भिसे.*. (प्रतिनिधी / अनिल चव्हाण.)—————————दिनांक 07 जानेवारी रोजी कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी व देवांश एज्युकेट यांच्या संयुक्त विद्यमाने बी. सी. ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. यावेळी त्यांनी विद्यार्यांना बी. सी. ए. चा अभास क्रम पूर्ण करत असताना Data Science व AI या विषयाचे कौशल्ये विकसित करावे. असे आवाहन केले.विद्यालयाच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून देवांश एज्युटेकचे संचालक माधव शर्मा व TCS, Accenture या कंपनीमध्ये डेटा सायंटिस्ट या पदावर कार्यरत राहिलेले श्रेयश औंढेकर ह्यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी कार्यशाळेत खालील विषयावर Data Science व AI या विषयावरील करिअर संधी व Data Science व AI वरील सर्व बेसिक व ऍडव्हान्स माहिती देण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात प्रथम कै.सौ. कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राध्यापक कांचन शर्मा यांनी केले. तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार प्राध्यापक निकिता कुलकर्णी यांनी मानले यावेळी प्राध्यापक अखिलेश शेख यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. परभणी शहरातील 150 विद्यार्थी BCA,BCS,MSC,MCA व B.SC (IT) मधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवलाआहे.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0