पत्रकार दिना निमित्त माननीय प्रताप दादा अरुणभाऊ अडसड यांच्या वाढदिवसा निमित्त वृद्धाश्रमात ब्लॅंकेट वाटप व पुरणपोळीचे स्नेहभोजन. (बोरगाव धांदे. पोलीस मीडिया प्रतिनिधी विपुल पाटील). 6 जानेवारी रोजी साजरा होणारा मराठी पत्रकार दिन बोरगाव धांदे येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून वृद्धांना ब्लॅंकेट वाटप तसेच पुरणपोळीचे स्नेहभोजन देण्यात आले. हा उपक्रम अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष संतोषजी वाघमारे महिला मुक्ती मोर्चा संघटना व संघटित युवा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राविण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉक्टर विनोद देशमुख विदर्भ अध्यक्ष आयुष भारत डॉक्टर असोसिएशन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून धामणगाव विधानसभा क्षेत्राचे निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे उपस्थित होते तसेच महिला मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष अशोक भाऊ खरात जिल्हाध्यक्ष संगीता इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती संचालन डॉक्टर किशोर बमणोटे आयुष भारत डॉक्टर असोसिएशन महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष व डॉक्टर विपुल पाटील वर्धा जिल्हा अध्यक्ष यांनी केले पूजनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले व सर्वांसाठी पुरणपोळीचे जेवण देऊन पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी महिला मुक्ती मोर्चा सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच महिला मुक्ती मोर्चा नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती ही याच कार्यक्रमात करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमासाठी संतोषजी वाघमारे अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तालुका उपाध्यक्ष यांनी विशेष परिश्रम घेतले सामाजिक बांधिलकी जपा साजरा करण्यात आलेला हा पत्रकार दिन उपस्थित त्यांच्या मनात विशेष ठसा उमटून गेला
byमीडीया पोलीस टाईम
-
0