श्री गणेश जयंती उत्सवा निमीत्य विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.... ( महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.20:- प.पु. विष्णुदास स्वामी महाराज आध्यात्मिक साधना केंद्र भद्रावती तर्फे स्थानिक दत्तवाडी सानेगुरूजी सोसायटी येथे श्री गणेशदत्त गुरुपंचायतन मंदिरात श्री गणेश जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात दिनांक 22 जानेवारी 2026 रोज गुरुवारला सकाळी 8 वाजता श्री गणेश पुजन व आरती, सकाळी 9.30 ला दैनंदिन पुजन व आरती सकाळी 10 ते 12.30 पर्यंत श्री. गणेश याग, दुपारी 1 ते 2.30 पर्यंत संगीत भजनावली,दुपारी 3 ते 4.30 पर्यंत अथर्व शीषांचे पाठ ( सहस्त्र आवर्तन ) सायं 4.45 ते 6.15 पर्यंत ह.भ. प. श्री. श्रावणजी डाखरे महाराज यांचे प्रवचन किर्तन, सायं 6.30 ला श्री गणेशाची महाआर ती 7 ते 8 पर्यंत उपासना, भजन संध्या, महाप्रसाद वितरण करण्यात येणार आहे. तरी सर्व साधक, उपासक, तसेच भक्त गणांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान आयोजका तर्फे करण्यात आले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0