श्री वासवी कन्यका माता परमेश्वरी मुर्ती व्दितीय स्थापना दिना निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन..... (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती दि.20:-भद्रावती ऐतिहासिक नगरीतील श्री कन्यका नगरी मधील श्री वासवी कन्यका माता परमेश्वरी देवस्थान येथे दिनांक 28 जानेवारी 2026 रोज बुधवारला श्री वासवी कन्यका माता परमेश्वरी मुर्ती व्दितीय स्थापना दिवसा निमीत्य विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7.30 वाजता मुर्ती अभिषेक, सकाळी 9:00 वाजता कुमकुम पूजा, सकाळी 10 वाजता 5 कुंडिय गायत्री यज्ञ, सायंकाळी 5 वाजता दीप यज्ञ, सांयकाळी 5.30 श्री वासवी कन्यका माता परमेश्वरी देवीची भव्य पालखी मिरवणुक पालखी, रथ, भजन, दिंडी, बँड सह, ढोल पथका सोबत शहरातील मुख्य मार्गाने काढण्यात येणार आहे. तरी आर्य वैश्य समाज बांधवांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. तसेच शोभा यात्रेत मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आव्हान श्री वासवी कन्यका माता परमेश्वरी देवस्थान चे अध्यक्ष निलेश गुंडावार तथा कार्यकारी मंडळाने केले आहे.

श्री वासवी कन्यका माता परमेश्वरी मुर्ती व्दितीय स्थापना दिना निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन.....                                              
Previous Post Next Post