विठ्ठल मंदिर, विरोदा येथे संगीतमय रामकथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह.... (विरोदा प्रतिनिधी किरण पाटील) - ता यावल विठ्ठल मंदिर, विरोदा येथे संगीतमय रामकथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह दि. २३/०१/२०२६ ते ३०/०१/२०२६ या कालावधीत अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न होणार आहे. या पवित्र सप्ताहाचे कथेचे वाचन ह.भ.प. वाल्मिक महाराज, कोथळी हे करणार असून सप्ताहाचे कथेचे यजमान श्री. पुरुषोत्तम हिरामण पाटील (रा. विरोदा, पोलीस पाटील) आहेत. या धार्मिक सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून मा. आमदार अमोल जावळे उपस्थित राहणार आहेत. सप्ताहकाळात दररोज सकाळी काकडा आरती, विष्णु सहस्त्रनाम व श्रीमद्भागवत कथा, सायंकाळी हरिपाठ तसेच रात्री किर्तन व अखंड नामसंकीर्तन असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. सप्ताहातील किर्तन सेवा पुढीलप्रमाणे होणार असून दि. २३/०१/२०२६ रोजी ह.भ.प. श्रीराम महाराज दाभाडी दि. २४/०१/२०२६ रोजी ह.भ.प. राजाराम महाराज नांदुरा, दि. २५/०१/२०२६ रोजी ह.भ.प. अविनाश महाराज नाचणखेडा दि. २६/०१/२०२६ रोजी ह.भ.प. ऋतुजा ताई कोथळी, दि. २७/०१/२०२६ रोजी ह.भ.प. समाधान महाराज तिग्रे दि. २८/०१/२०२६ रोजी ह.भ.प. आकाश महाराज जळकेकर, दि. २९/०१/२०२६ रोजी ह.भ.प. संतोष महाराज शेंदुर्णी तर दि. ३०/०१/२०२६ रोजी ह.भ.प. वाल्मिक महाराज, कोथळी यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० ते १२ या वेळेत संपन्न होणार आहे. दि. ३०/०१/२०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत भव्य दिंडी सोहळा पार पडणार असून दुपारी १२ ते ४ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात मृदंगाचार्य ह.भ.प. निरोष महाराज (डॉ. कोतेरा), गायनाचार्य ह.भ.प. खुशाल महाराज (डोंगर कठोरा), ह.भ.प. भूषण महाराज (चितोडा, ह.भ.प. अंकुश महाराज (अकोला), संगीत गायनाचार्य ह.भ.प. आकाश महाराज (आळंदीकर), ह.भ.प. निखिल महाराज (शेलार), ओवी गायन ह.भ.प. शिवशरणदास वाघमारे (अकोला) तसेच तबला वादन ह.भ.प. प्रणव महाराज (अकोला) आपली सेवा बजावणार आहेत. या संपूर्ण धार्मिक सोहळ्यासाठी गावातील सर्व तरुण मित्र मंडळाने मोलाचे सहकार्य लाभत असून भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रामनामाचा गजर करत आध्यात्मिक आनंदाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

विठ्ठल मंदिर, विरोदा येथे संगीतमय रामकथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह....                                                             
Previous Post Next Post