वंचित बहुजन आघाडी चे नेते अश्विन तावाडे यांनी केली मुख्यमंत्र्या कडे महाजन वर कारवाई ची मागणी... नाशिक येथील 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नाव आपल्या भाषणात कुठे न घेता ज्या संविधान मुळे भारत प्रजासत्ताक झाले त्या महामानवाचे नाव न घेऊन केले अपमान अशी प्रतिक्रिया दिलीहिंगणघाट | दि. 27/01/2026नाशिक येथे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून, संविधान, संविधाननिर्माते व संपूर्ण बहुजन समाजाचा थेट अपमान आहे.या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा हिंगणघाट विधानसभा उमेदवार अश्विन तावाडे यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) हिंगणघाट यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधित मंत्री श्री. गिरीश महाजन यांच्यावर SC/ST Atrocities Act अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करण्याची, तसेच या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, बाबासाहेबांचा अपमान सहन केला जाणार नाही. दोषींवर तात्काळ व कठोर कारवाई न झाल्यास वंचित बहुजन आघाडी हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात तीव्र जनआंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाकडे या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन संविधानाचा सन्मान राखण्याची ठाम मागणी केली आहे..! वर्धा जिल्हा प्रतिनिधी फैमोद्दीन शेख

वंचित बहुजन आघाडी चे नेते अश्विन तावाडे यांनी केली मुख्यमंत्र्या कडे महाजन वर कारवाई ची मागणी...                      
Previous Post Next Post