**ध्वजारोहना नंतर नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणात सामुदायिक कवायतीचा भव्य कार्यक्रम संपन्न*. (मानवत / प्रतिनिधी).*****—————प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आज दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी येथील नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणावर देशभक्तीपर वातावरणात सामुदायिक संगीतमय कवायतीचा भव्य कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात शहरातील सरस्वतीबाई भाले पाटील विद्यालय, शकुंतलाबाई कांचनराव कत्रूवार विद्यालय, के. के. एम. महाविद्यालय, इकरा उर्दू शाळा तसेच इतर सर्व शाळांमधील सुमारे दोन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींनी या संगीमत कवायती मध्ये सहभाग नोंदवला. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी एकत्र येत विविध प्रकारच्या शिस्तबद्ध कवायती नेताजी सुभाष विद्यालयाच्या प्रांगणावर सादर करण्यात आल्या. देशभक्ती गीतांच्या तालावर सादर करण्यात आलेल्या कवायतींमुळे संपूर्ण विद्यालय परिसर देशभक्तीच्या भावनेने भारावून गेला.यावेळी कार्यक्रमास मानवत तहसिलचे तहसीलदार मा. पांडुरंग माचेवाड, मानवत पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी मा. मंगेशजी नरवडे साहेब, मानवत नगर पालिकेच्या मुख्याधिकारी श्रीमती कोमलताई सावरे मॅडम, मानवतचे प्रथम नागरिक मा. डाॅ.अंकुशरावजी लाड, संस्थेच्या अल्काताई सोळंके, सोरेकर, मुख्याध्यापक संजयजी लाड, उपमुख्याध्यापक विश्वनाथ बुधवंत, माणिकराव सिसोदे, प्राध्यापक बाळासाहेब नाईक , राजन सूर्यवंशी, सदाशिव होगे, अशोक काळे,प्रा. शिवाजीराव रणवीर, यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच शहरातील सहभागी झालेल्या सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या कवायती घेण्यात आल्या. यासोबतच कॉपीमुक्त परीक्षा अभियान व मतदार जनजागृती याबाबत शपथ देण्यात आली. यावेळी माननीय तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी स्वतः पुढाकार घेत विद्यार्थ्यांना शपथ दिली.यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संजय लाड, उपमुख्याध्यापक विश्वनाथ बुधवंत सर, अशोक बैस सर, बाभळे सर, सदाशिवराव होगे पाटील, अशोक काळे सर, माणिक सिसोदिया सर, ज्ञानेश्वर कैसाईतकर सर, शिवाजी रणवीर सर, शेषराव ढगे सर, गणेश सिरसकर सर, सुनील लाड सर, राज सूर्यवंशी सर, बाळासाहेब नाईक सर, सौ. कुसुम कनकुटे, सौ. अनिता पतंगे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0