चोपडा नगरपरिषदेचा अभिनव उपक्रम! नागरिकांना स्वच्छता व दिवाबत्ती तक्रारींसाठी व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध करून दिला*. (चोपडा ( संजीव शिरसाठ ) नगरपरिषद ही शहरातील नागरिकांना नियमितपणे विविध नागरी सुविधा तत्परतेने पुरविण्याचे काम करीत आहे. यामध्ये स्वच्छता, विद्युत विभाग (स्ट्रीट लाईट) विभागाशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी विविध माध्यमांतून नगरपरिषदेस प्राप्त होत असतात. मात्र, अनेक वेळा नागरिकांना नगरपरिषदेच्या कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याशी, तसेच कोणत्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा याबाबत संभ्रम निर्माण होत असल्याने तक्रारींच्या निवारणास विलंब होत होता. परिणामी नागरिकांची हेळसांड होत असल्याचे निदर्शनास आले आहे.ही बाब लक्षात घेऊन नगराध्यक्षा सौ.नम्रता पाटील व मुख्याधिकारी श्री. रामनिवास झंवर यांच्या संकल्पनेतून स्वच्छता विभाग व विद्युत विभागासाठी स्वतंत्र भ्रमणध्वनी उपलब्ध करून देत तक्रार निवारणासाठी स्वतंत्र व्हॉटॲप क्रमांक निश्चित केला आहे. या माध्यमातून आता नागरिक घरबसल्या तक्रार करू शकणार असून या तक्रारी व्हॉट्सॲप संदेशाद्वारे स्वीकारण्यात येणार आहेत.या तक्रार निवारण भ्रमणध्वनीचे दि.27/01/2026 रोजी अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना नगराध्यक्षा सौ.नम्रता पाटील यांनी सांगितले की, शहरातील नागरी सुविधा अधिक सक्षमपणे राबविणे तसेच नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ व प्रभावी निराकरण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.शहरातील कचरा वेळेवर न उचलणे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता, कचरा साचणे, सार्वजनिक स्वच्छतागृहांशी संबंधित समस्या, तसेच रस्त्यावरील दिवे बंद असणे, नादुरुस्त होणे किंवा अपुऱ्या प्रकाशामुळे होणाऱ्या अडचणी याबाबत नागरिकांनी थेट नगरपरिषदेकडे व्हॉट्सॲप संदेशाद्वारे तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन मुख्याधिकारी श्री.रामनिवास झंवर यांनी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.नागरिकांच्या सोयीसाठी खालील तक्रार क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले असून, या क्रमांकावर प्राप्त होणाऱ्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेऊन संबंधित विभागप्रमुख व कर्मचारी यांच्यामार्फत तात्काळ पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.• *स्वच्छता विभाग तक्रार क्रमांक : 7821989533*• *विद्युत (दिवाबत्ती) विभाग तक्रार क्रमांक : 9529296921*• *तक्रार नोंदणी : तक्रार व्हॉट्सॲप संदेशाद्वारे स्विकारण्यात येईल.*शहर स्वच्छ, सुरक्षित व प्रकाशमान ठेवण्यासाठी नागरिकांनी या सेवेचा योग्य वापर करावा, असे आवाहन चोपडा नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
byमीडीया पोलीस टाईम
-
0