*अमृत नन्नावरे यांचे मरणोत्तर देहदान*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधी भद्रावती) भद्रावती,दि.२७:- येथील आयुध निर्माणीतील सेवानिवृत्त कर्मचारी तथा शिंदे ले आऊट निवासी अमृतराव जैरामजी नन्नावरे यांचे नुकतेच मरणोत्तर देहदान करण्यात आले. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे देहदान करण्यात आले.अमृतराव नन्नावरे यांचे दि.२५ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले.मृत्यूसमयी ते ७९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई आणि नातवंड असा आप्त परिवार आहे. ते रामकृष्ण मिशनचे आजीवन सभासद होते. तसेच येथील माना जमात वधू-वर सूचक मंडळाचे कार्यकर्ते होते.मरणोपरांत देहदान करण्याची त्यांची इच्छा होती.त्यानुसार त्यांच्या कुटुंबियांनी देहदान केले.

अमृत नन्नावरे यांचे मरणोत्तर देहदान*.                                                 
Previous Post Next Post