30 लाखांचा निधी मंजूर असूनही काम रखडले ; 2–3 नागरिक नाल्यात पडूनही प्रशासन गप्प — भिडीतील नागरिकांच्या जीवाशी थेट खेळदेवळी तालुक्यातील भिडी गावातून जाणाऱ्या घोडी नाल्यावर रस्ता मोठ्या प्रमाणात खचलेला असून हा मार्ग नागरिकांसाठी जीवघेणा ठरला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ₹30 लाखांचा निधी मंजूर झालेला असतानाही अद्याप प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. परिणामी नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.या धोकादायक ठिकाणी आतापर्यंत 2 ते 3 नागरिक नाल्यात पडल्याच्या घटना घडल्या असून, सुदैवाने जीवितहानी टळली आहे. मात्र अशा घटना घडूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे तात्पुरत्या सुरक्षा उपाययोजना करण्याबाबत अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले होते, तरीही बॅरिकेड्स, इशारा फलक किंवा तात्पुरती दुरुस्तीही करण्यात आलेली नाही, ही बाब प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे गंभीर उदाहरण आहे.या संपूर्ण प्रकरणाबाबत जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष), वर्धा — पारस चोरे यांनी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती दिली होती. अधिकाऱ्यांनी काम मंजूर असल्याचे मान्य केले असतानाही प्रत्यक्षात कोणतीही हालचाल न झाल्याने “लोकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू आहे”, असा तीव्र आरोप ग्रामस्थ व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.मंजूर निधी असूनही काम सुरू न करणे, तसेच तात्पुरते उपायही न करणे ही बाब अत्यंत गंभीर असून, तात्काळ काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पारस चोरे व नागरिकांकडून देण्यात आला आहे.

30 लाखांचा निधी मंजूर असूनही काम रखडले ; 2–3 नागरिक नाल्यात पडूनही प्रशासन गप्प —                           
Previous Post Next Post