आज मौजा चिकमोह येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लेखाशिर्ष २२२५ – डॉ. बी.आर. आंबेडकर सामाजिक विकास निधी अंतर्गत १५.०० लक्ष रुपयेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभवन या सार्वजनिक सुविधेचे लोकार्पण अत्यंत उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात पार पडले. या लोकार्पण सोहळ्यामुळे चिकमोह गावातील नागरिकांना एक सुसज्ज, सुरक्षित व सर्वांसाठी खुला सार्वजनिक मंच उपलब्ध झाला आहे. या समाजभवनामध्ये विविध सामाजिक कार्यक्रम, शासकीय बैठका, महिला व युवकांसाठी मार्गदर्शन शिबिरे, सांस्कृतिक उपक्रम, तसेच शैक्षणिक व सामाजिक जागृती कार्यक्रम आयोजित करता येणार असून, गावातील एकात्मता व सहभागाची भावना अधिक दृढ होणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता व सामाजिक न्यायाच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवणारा हा प्रकल्प असून, समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने एकत्र येण्याची संधी देणारा आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे मागास व वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.लोकार्पण प्रसंगी मा.श्री.आमदार समीर कुन्नावार साहेब व मान्यवर, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, ग्रामस्थ, महिला भगिनी, युवक व जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0