शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या वतीने माझा वर्ग मूल्यवर्धित वर्ग उपक्रम साजरा* (मानवत / अनिल चव्हाण)———————जिल्हा परिषद प्रशाला हादगाव (बु) तालुका पाथरीचा उपक्रम *"माझा वर्ग -मूल्यवर्धित वर्ग "* आजच्या पिढीमध्ये संविधानिक मूल्य तसेच काळानुरूप मूल्य नष्ट होण्याच्या मार्गावर दिसत आहेत. याची कारणे शोधून शांतीलाल मुथा फाउंडेशन व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांनी मूल्यवर्धन 3.0 साठी सामंजस्य करार केलेला आहे.या कराराअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मूल्यवर्धन 3.0 प्रकल्प सुरू केलेला आहे.या अंतर्गत जिल्हा परिषद प्रशाला हादगाव (बु) तालुका पाथरी येथील राज्य प्रशिक्षक सुधीर पाटील यांनी आपला स्वतःचा वर्गासाठी " माझा वर्ग - मूल्यवर्धित वर्ग "या उपक्रमाचे आयोजन आज प्रजासत्ताक दिनी करण्यात आले.या उपक्रमाचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समिती हादगाव (बु) यांनी केले. या उपक्रमात शालेय व्यवस्थापन समिती सदस्यांनी शाळेबरोबर आपले गाव देखील मूल्यवर्धित करण्यासाठी सहकार्य करावे ही अपेक्षा व्यक्त केली. या नवो उपक्रमास समितीने शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी तालुका समन्वयक प्रवीण नरवाडे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक व शालेय व्यवस्थापन समिती यांना मूल्यवर्धन ची प्रतिज्ञा दिली. या उपक्रमास शाळेतील सर्व शिक्षक वृंद व मुख्याध्यापक यांचे अनमोल सहकार्य लाभले.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0