आज वर्धा येथे जिल्हा नियोजन समितीची एक महत्त्वाची बैठक वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. पंकजजी भोयर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या विविध विकासात्मक मुद्द्यांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले.जिल्ह्यात सध्या राबविण्यात येत असलेल्या विकास योजनांचा आढावा घेऊन त्यांच्या अंमलबजावणीची स्थिती, प्रगती अहवाल तसेच आगामी आर्थिक वर्षासाठी प्रस्तावित असलेल्या योजनांवर विशेष भर देण्यात आला. ग्रामीण व शहरी भागातील पायाभूत सुविधांचा विस्तार, रस्ते विकास, पाणीपुरवठा, वीज व्यवस्था, आरोग्य सेवा, शिक्षण व्यवस्था, कृषी विकास आणि रोजगारनिर्मिती यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर उपस्थित सदस्यांनी आपापली मते व सूचना मांडल्या.यावेळी वर्धा जिल्ह्याचे खासदार श्री अमरजी काळे, विधान परिषद सदस्य श्री. दादारावजी केचे, पुलगाव देवळी विधानसभेचे आमदार श्री राजेशजी बकाने, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे मा ना श्री.समीर जी कुन्नावार,श्रीमती वान्मथी सी. (भा.प्र.से) जिल्हाधिकारी, मा ना श्री.सौरभ कुमार अग्रवाल आईपीएस वर्धा जिला पोलिस अधीक्षक,श्री परागजी सोमण भा.प्र.से. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्धा व संबंधित अधिकारी उपस्थित होते..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलीस टाईम विभागीय उपसंपादक

Previous Post Next Post