क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.......................... दिनांक : ०३ जानेवारी २०२६ स्थळ मा.श्री.आमदार समीरभाऊ कुणावार जनसंपर्क कार्यालय, हिंगणघाट........आज हिंगणघाट येथे कार्यसम्राट आमदार मा. श्री. समीरभाऊ कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्त्री शिक्षण, सामाजिक न्याय आणि समतेच्या चळवळीला दिशा देणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.ज्या काळात स्त्री शिक्षण हे पाप मानले जात होते, त्या काळात सावित्रीबाईंनी शाळेचा उंबरठा समाजासाठी उघडला. त्यांनी पेटवलेली शिक्षणाची मशाल आजही कोट्यवधींच्या जीवनाला प्रकाश देत आहे.देशातील पहिल्या महिला शिक्षिका, निर्भय समाजसुधारिका आणि समतेच्या विचारांची तेजस्वी ज्योत — क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी त्यांच्या विचारांना, संघर्षाला आणि महान कार्याला कोटी कोटी वंदन!आज त्यांच्या विचारांवर चालत, शिक्षण सर्वांसाठी, समान संधी आणि सामाजिक सन्मान यासाठी आपण कटिबद्ध राहणे हीच खरी आदरांजली आहे.या प्रसंगी कार्यसम्राट आमदार मा.श्री. समीरभाऊ कुणावार, हिंगणघाट नगराध्यक्षा डॉ नयना उमेश तुडसकर व महिला मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा
byमीडीया पोलीस टाईम
-
0