**ज्ञानोपासक* विद्यालयास शिक्षणविस्तार अधिकारी पवार यांनी दिली भेट.... (मानवत / प्रतिनिधी.)————————मानवत तालूक्यातील रामेटाकळी येथील ज्ञानोपासक विद्यालयात मुख्यमंत्री *माजी शाळा सुंदर शाळा* या अभियाना अर्तगत रामेटाकळी येथील ज्ञानोपासक विद्यालयास मानवत पंचायत समिती शिक्षण विभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री पवार साहेब व गट साधन केद्रातील तज्ञ मार्गदर्शक मा. राजकूमार गाडे सर, गिरी सर यांनी ज्ञानोपासक विद्यालयास भेट दिली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री श्रीराम टाकळगव्हाणकर सर व ज्येष्ठ शिक्षक श्री. प्रकाश कडतन सर यांनी यावेळी उपस्थित सर्व सन्माननीय सदस्य यांचे स्वागत करून अभिनंदन केले. यावेळी उपस्थित सर्व सन्माननीय सदस्यांनी विद्यालयाच्या विविध शैक्षणिक उपक्रमाचे निरीक्षण करून समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित शालेय विद्यार्थीनी मराठमोळा गणवेष परिधान करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत गीतांनी स्वागत केले. यावेळी विद्यालयातील, शिंपले सर,राऊत सर, रासवे सर, काळे सर, नाहतकर सर, गरुड सर,कदम सर,श्रीमती गिरी मॅडम आदी सह शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीच्या शालेय विद्यार्थ्यांची उपस्थिती होती..

ज्ञानोपासक* विद्यालयास शिक्षणविस्तार अधिकारी पवार यांनी दिली भेट....                                                                       
Previous Post Next Post