*श्री.संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सवाच्या निमित्ताने**समुद्रपूर येथे गुडघेदुखी निवारणासाठी भव्य शिबिराचे आयोजन* समुद्रपूर (जि. वर्धा):येथील श्री. हनुमान व संत गजानन महाराज दुर्गा माता देवस्थान यांच्या वतीने श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सवाच्या निमित्ताने गुडघेदुखीने त्रस्त नागरिकांसाठी बिना ऑपरेशन व औषधांशिवाय गुडघेदुखी कमी करण्याच्या उपायांचे भव्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.हे शिबिर रविवार, दिनांक ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंतस्थळ : देवस्थानचे सभागृह, आठवडी बाजार, समुद्रपूर येथे संपन्न होणार आहे.या शिबिरामध्ये गुडघ्याच्या टोंगळ्याचे दुखणे, चालताना होणारी वेदना, सूज व जिना चढताना होणारा त्रास यावर विशेष गुडघेदुखी पट्टा (निब्रेज) बांधण्याची प्रात्यक्षिके व मार्गदर्शन दिले जाणार आहे. या पद्धतीत शस्त्रक्रिया किंवा औषधांची आवश्यकता नसून कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत, असे आयोजकांनी सांगितले.पट्टा बांधल्यानंतर गुडघ्याच्या हाडांची घर्षण क्रिया कमी होते, त्यामुळे वेदना व सूज लवकर आटोक्यात येते. तसेच रुग्णांना जिना चढणे, दुचाकीला किक मारणे व दैनंदिन घरकाम करणे सुलभ होते. महिलांसाठी स्वयंपाक करताना हा पट्टा उपयोगी ठरतो, असेही यावेळी सांगण्यात आले.शिबिरात पट्टा योग्य पद्धतीने कसा बांधावा, किती वेळ वापरावा, काळजी कशी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व गुडघेदुखीने त्रस्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

श्री.संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सवाच्या निमित्ताने**समुद्रपूर येथे गुडघेदुखी निवारणासाठी भव्य शिबिराचे आयोजन*                                                              
Previous Post Next Post