**पारवा* येथे राष्ट्रिय सेवा योजनेच्या वतीने शिबीराचे आयोजन... (प्रतिनिधी / अनिल चव्हाण ) ९५२७३०३५५९-———————————कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे विशेष वार्षिक शिबीर-२०२५-२६ चे मौजे. पारवा येथे आयोजन कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे विशेष वार्षिक शिबीर-२०२५-२६ चे मौजे. पारवा येथे आयोजन करण्यात आले आहे.या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या वतीने रविवार दि. १८ जानेवारी २०२६ ते शनिवार दि. २४ जानेवारी २०२६ दरम्यान विविध योग, मोफत आरोग्य तपासणी व मोफत आवश्यक त्या रक्त तपासणी शिबीरांचे आयोजन शालेय विद्यार्थ्यांसाठी,शिक्षकवृंद व ग्रामास्था करीता करण्यात आले आहे. या शिबिराच्या अंतर्गत वेगवेगळ्या कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे, जेने करून रा. से. यो. च्या सर्व विद्यार्थीनींना, मौजे.पारवा. प्राथमिक प्रशाला विद्यार्थी, सर्व शिक्षक, ग्रामीण भागातील सर्व उपस्थित नागरिकांचे बौद्धिक,सामाजिक, मानसिक,साहित्यिक, क्रिडात्मक व मनोरंजनात्मक लाभ घेता येईल.तरी सर्व वाचक व श्रोत्यांना ता. जि. पारवा येथे आयोजित या शिबिराचे कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावे. असे आवाहन प्राचार्य. डॉ. रामचंद्र भिसे, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी, प्रा. डॉ. नसीम बेगम, प्रा.डॉ. संगीता लोमटे व प्रा. अरुण पडघन, डॉ अभिजित सरनाईक प्रा.डॉ. गंगाधर गव्हाणे, प्रा.दिनेश धनेश्वर यांनी केले आहे.***
byमीडीया पोलीस टाईम
-
0