फैजपूर येथील प्रांताधिकारी बबनराव काकडे यांची गहू खेडा येथील शेतकऱ्यांसोबत रावेर तहसील कार्यालयात विशेष आढावा बैठक,, (मीडिया पोलीस टाईम विशेष जळगाव जिल्हा प्रतिनिधी - विनोद हरी कोळी) . दिनांक 15 जानेवारी या रोजी रावेर येथील तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी यांच्या विशेष उपस्थितीमध्ये गहू खेडा येथील ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी पाटील यांनी शेतकऱ्यांचे विशेष सभाचे नियोजन लावले, आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. रावेर तालुक्यातील गहू खेडा या गावातील शेतकऱ्यांच्या शेतामधून केंद्र शासनाने रेल्वे लाईन टाकण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा स्पष्ट विरोध शेतकऱ्यांचा आहे. गहू खेडा गावातील शेतकरी हे अल्पभूधारक असून, त्यांच्या फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, तसेच आम्ही नुकसान सहन करू शकणार नाहीत. तसेच केंद्र शासनाने रेल्वे लाईन दुसऱ्या मार्गाने वळवण्यात यावी, असे स्पष्ट मत यावेळी शेतकऱ्यांनी मांडले आहेत. असे शेतकऱ्यांच्या वतीने ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी पाटील यांनी आपले मत शेतकऱ्यांच्या बाजूने मांडले आहेत. रेल्वे लाईन पडल्याने शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होऊ शकते. तसे झाल्यास शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक शिवाजी पाटील यांनी यावेळी दिला आहेत.
byमीडीया पोलीस टाईम
-
0