पोलीस स्टेशन भद्रावतीच्या हद्दीत अनोळखी इसमाचा मृत्यू...- मृतक अनोळखी इसमाची ओळख पटल्यास माहिती देण्याचे आवाहन.‌.‌


पोलीस स्टेशन भद्रावतीच्या हद्दीत अनोळखी इसमाचा मृत्यू...

- मृतक अनोळखी इसमाची ओळख पटल्यास माहिती देण्याचे आवाहन.‌.‌


भद्रावती चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक 

भद्रावती दि.19:-  चंद्रपूर जिल्हातंर्गत भद्रावती येथे  दिनांक १८/०४/२०२६ रोजी फिर्यादी नामे संदीप वि‌ठ्ठलराव मंन्दे वय ३८ वर्ष रा.गणपती वार्ड गवराळा भद्रावती हे त्यांचे ट्राकमॅन कर्तव्यावर लोकेशन ५८७/० कोंढारी ठिकाणी असतांना अंदाजे ०१/०० वा ते ०१/१५ वाजताचे दरम्यान विशाषापट्टनम ते नई दिल्ली जाणारी आंद्रप्रदेश एक्सप्रेस सदर ठिकाणी आली व तिस समोरच्या स्टेशनवरून सिंगल प्राप्त न झाल्याने रेल्वे रूळावर थांबून असतांना त्यामधून एक अनोळखी इसम हा खाली उतरला व तो लडखडत आमचे लोकेशन ५८७/० कोंढारी कडे येतांना दिसला.
      त्याचे तोंडातून फेस येत असून त्यास फिट आल्याचे दिसत होते.म्हणून तक्रारदार संदीप मन्दे व त्यांच्या सोबत कर्तव्यावर असलेले रूपेश घाटे व रवि बन्सल यांनी त्यास पाणी पाजले व त्याची प्रकृती ठिक दिसत नसल्याने आमचे ग्रुप इंचार्ज रवि प्रकाश सूमन यांचे सांगितलेवरून रूपेश घाटे व रवि बन्सल यांनी त्या अनोळखी इसमास वैद्यकिय उपचाराकरीता घोडपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेवून गेले असता तेथील वैद्यकिय अधिकारी यांनी त्या ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे रेफर केल्याने रूपेश घाटे व रवि बन्सल तसेच तक्रारदार संदीप मान्दे यांनी नमूद अनोळखी इसमास ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे उपचाराकरीता घेवून येवून त्यास भर्ती केले असता त्यास वैद्यकिय अधिकारी यांनी उपचार सूरू करून पूढील उपचाराकरीता सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर केले असता अम्बूलन्स येण्याची वाट पाहत असतांना नमूद अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील वैद्यकिय अधिकारी यांनी घोषीत केले.
      असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरून व ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथील ब्रॉड डेथ मेमोवरून पोस्टे भद्रावती येथे मर्ग क. ३२/२०२६ कलम १९४ भा. ना. सू.सं अन्वये नोंद करून चौकशीत घेण्यात आला आहे.
      सदर मर्गमधील अनोळखी मृतक इसमाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष असून बांधा सडपातळ मजबूत असून अंदाजे उंची ५ फूट ३ इंच असून अंगात पांढरी रंगाच्या हाफ बाह्याची टिशर्ट व असून त्याखाली खाली रंगाची बनियान असून,पायात निळ्या रंगाचा फूटपॅन्ट व कथीया रंगाची लायलिंग असलेली अंडरवेयर परिधान केलेली असून कमरेवर पॅन्टला ब्राउन रंगाचा चामडी बेल्ट लावलेला आहे. 
       सदर अनोळखी मृतक इसमाचे खिशात विशाषापट्टनम ते नई दिल्ली जाणारी रेल्वेचे जनरल टिकीट क. 610BEBM2C5 या क्रमांकाचे दिनांक १७/०४/२०२६ रोजीचे टिकीट मृतक इसमाचे पॅन्टचे खिशात मिळून आले आहे.
      नमूद वर्णनाचे अनोळखी मृतक इसमाबाबत कोणाला माहीती असल्यास पोलीस स्टेशन भद्रावती येथील पूढील दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा किंवा प्रत्यक्ष पोलीस स्टेशनला हजर येवून माहीती द्यावी असे आवाहन पोलीस स्टेशन भद्रावतीचे ठाणेदार श्री.योगेश्वर पारधी यांनी केले आहे.
    (संपर्क क्र.:-  ८८०६०००७०,, ९७६४३२५४९३,,८७८८५८४५६८,,९९६०१६००२८...)
Previous Post Next Post