*मानवत येथे श्री योगानंद महाराज चरित्राचे सामूहिक पारायण सोहळा संपन्न*
मानवत / परभणी जिल्हा विभागीय संपादक अनिल चव्हाण
——————————
मानवत दिनांक १९ रोजी
येथील श्री योगानंद महाराज स्थापित श्रीदत्त मंदिरामध्ये श्रीमत् प.प. स. योगानंद सरस्वती स्वामी महाराज समाधी शताब्दी वर्षा निमित्त सामूहिक पारायण सोहळा शनिवारी दिनांक १८ एप्रिल रोजी जुने दत्त मंदिर सभागृहात श्री योगानंद महाराज संस्थान गुंज विश्वस्त श्री भक्तेश भाई देसाई महाराज यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
श्रीमत् प.प.स. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचे पट्टे शिष्य श्रीमत् प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या समाधी शताब्दी सोहळा सन २०२८ मध्ये भव्य दिव्य स्वरूपात साजरा करण्याचा मानस श्री योगानंद महाराज संस्थान गुंज येथील पिठाधीश श्री परमपूज्य राजेश भाई देसाई महाराज यांचा आहे.
म्हणून परभणी जिल्ह्यात व मराठवाड्यात ज्यांनी दत्त भक्तीची गोडी निर्माण केली असे श्री योगानंद महाराज यांच्या जीवन कार्य व लीला जन सामान्य भक्तांना माहीत व्हावी व दत्त भक्तीची गोडी समस्त भाविक भक्त गणामध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने ज्या ठिकाणी श्री योगानंद महाराजांचे वास्तव्य होते अशा ठिकाणी श्री योगानंद महाराज चरित्र या दिव्य ग्रंथाचे सामूहिक पारायण प्रत्येक महिन्यात आयोजित केले आहेत. या महिन्यात मानवत येथील जुने दत्त मंदिर मध्ये सामूहिक पारायण संपन्न झाले.
या पारायण सामूहिक पारायणात ३०० भाविक महिला-पुरुषांनी आपला सहभाग नोंदवला. यावेळी गूरू अरविंद वसेकर यांनी महाराजांच्या जीवन प्रवास व त्यांच्या लीला यावर प्रवचन केले तसेच यावेळी पंचपदी, महाआरती, महाप्रसाद त्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री दत्तमंदिर संस्थाचे अध्यक्ष अँड. अनिरुद्धजी पांडे यांनी केले.
कार्यक्रमासाठी परभणी, परतुर , ब्रह्मवाकडी, संभाजीनगर, नांदेड, सेलू, पाथरी व मराठवाड्यातील विविध भागातून भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होती.
*=========*

