रावेर. तालुक्यातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर रावेरला ..ऑनलाइन लोकार्पण आमदार अमोल जावळे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश रुग्णांना मोठा दिलासा ..


रावेर. तालुक्यातील पहिले शासनमान्य डायलिसिस सेंटर रावेरला ..ऑनलाइन लोकार्पण आमदार अमोल जावळे यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश रुग्णांना मोठा दिलासा ..
भामलवाडी तालुका रावेर प्रतिनिधी नरेंद्र भालेराव

 किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी दिलासादाय ठरणारी महत्त्वपूर्ण सुविधा आता रावेरमध्ये उपलब्ध होणार आहे तापी परिसरातील पहिले शासनमान्य मोफत डायलिसिस सेंटर रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात सुरू होत असून या केंद्राचे लोकार्पण उद्या दिनांक १ मे महाराष्ट्र दिन रोजी सकाळी११.०० वाजता राज्याचे आरोग्य मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे आरोग्य विभागाच्या वतीने राज्यभरातील काही ठिकाणी डायलिसिस सेंटरचे लोकार्पण होत असून रावेर ग्रामीण रुग्णालयाचा समावेश करण्यात आला आहे या निर्णयामुळे रावेर सह यावल, फैजपूर, मुक्ताईनगर तसेच या परिसरातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे उद्या या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यास लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि स्थानिक स्तरावर संबंधित अधिकारी वैद्यकीय कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित राहणार असून शासनाच्या या निर्णयाचे परिसरात स्वागत होत आहे आमदार अमोल जावळे साहेब यांच्या सततच्या पाठपुरामुळेच ही सुविधा रावेरला मिळण्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे प्रतिनिधी नरेंद्र भालेराव भामलवाडी
Previous Post Next Post