भगव्या वादळाने पाडळसे नगरी दुमदुमली; हजारोंच्या उपस्थितीत हिंदू एकतेचा बुलंद हुंकार**

**भगव्या वादळाने पाडळसे नगरी दुमदुमली; हजारोंच्या उपस्थितीत हिंदू एकतेचा बुलंद हुंकार**

**पाडळसे (ता. यावल) | वार्ताहर**सुरेश खैरनार 

पाडळसे येथे १७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेले 'भव्य हिंदू संमेलन' अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडले. या संमेलनासाठी पाडळसे सह संपूर्ण परिसरातून हजारो हिंदू बांधव, माता-भगिनी आणि तरुणांनी हजेरी लावली होती. संपूर्ण गाव भगव्या ध्वजांनी आणि 'जय श्रीराम'च्या जयघोषाने राममय झाले होते.


* **विद्वान वक्त्यांचे मार्गदर्शन:** व्यासपीठावरून उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख संत परम पूजनीय लक्ष्मणदासजी महाराज अयोध्यावासी फलचारी आश्रम रावेर तर प्रमुख वक्ते श्री केदार दिलीप ओक भुसावळ यांचे मार्गदर्शन लाभले मान्यवर वक्त्यांनी हिंदू धर्मातील एकता, गौरवशाली इतिहास आणि तरुण पिढीचे कर्तव्य यावर मार्गदर्शन केले. समरसता , एकता , बंधुता  व
१) सामाजिक समरसता
२) कुटुंब प्रबोधन
३) नागरिक कर्तत्व
४) पर्यावरण संरक्षण
५) स्व - आधारित जीवन
पंच परिवर्तन, जातीभेद विसरून केवळ हिंदू म्हणून एकत्र येण्याची ही वेळ आहे असा सूर वक्त्यांच्या भाषणातून उमटला.

### **शिस्तबद्ध नियोजन आणि माणुसकी:**
एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय असूनही संमेलन अत्यंत शिस्तीत पार पडले. 
* **स्वयंसेवकांची फौज:** शेकडो तरुणांनी स्वयंसेवक म्हणून  पाणी वाटप , महाप्रसाद वाटप आणि स्वच्छता राखण्याचे काम चोख बजावले.
* **पोलीस प्रशासन:** फैजपूर  पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता, त्यांनाही ग्रामस्थांनी पूर्ण सहकार्य केले.

### **आयोजकांकडून आभार प्रदर्शन:**
संमेलनाच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे आणि उपस्थित भाविकांचे सकल हिंदू समाज, पाडळसे यांच्या वतीने आभार मानण्यात आले. "या संमेलनाने केवळ एक कार्यक्रम न राहता एक विचारांची चळवळ सुरू आहे अशी भावना आयोजकांनी व्यक्त केली.
Previous Post Next Post