परभणी जिल्हा पोलिस अधिक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती**{ रविंद्रसिंह परदेशी राज्य गुप्त वार्ता विभागात. }*

*परभणी जिल्हा पोलिस अधिक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती*


*{ रविंद्रसिंह परदेशी राज्य गुप्त वार्ता विभागात. }*

            
मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक अनिल चव्हाण
———————————

परभणी जिल्हा पोलिस अधिक्षकपदी पंकज कुमावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्याच्या गृह विभागाने गुरुवार 30 एप्रिल रोजी राज्यातील 21 वरिष्ठ पोलिस  अधिकार्‍यांच्या बदल्यांसंदर्भात आदेश लागू केले. त्यात परभणीचे जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांची राज्य गुप्त वार्ता विभागात उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या जागेवर अमरावती येथील अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांची अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
            परभणीचे अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुंजाळ यांची मालेगावात अप्पर पोलिस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्या रिक्त जागेवर अन्य कोणाचाही नियुक्ती करण्यात आली नाही. गृह विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाडे यांनी या संदर्भातील शासन आदेश निर्गमित केले आहेत
Previous Post Next Post